Delhi : दिल्ली पोलिसांनी आंदोलक महिला कुस्तीपटूंना बळजबरीने घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज- बॅरिकेट्स ओलांडून आंदोलक कुस्तीपटू नवीन संसदेच्या दिशेने कूच करत असताना दिल्ली पोलिसांनी  बळाचा वापर करत त्यांना  रोखण्याचा प्रयत्न केला.तसेच (Delhi ) बळजबरीने बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले.

कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक 23 एप्रिलपासून कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेसाठी जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर, त्यांच्याविरूद्ध या प्रकरणात दोन एफआयआर नोंदवण्यात आले. त्यांच्यावर आधीच 40  गुन्हेगारी खटले चालू आहेत.

त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी दिल्लीतील नवीन संसद भवनाबाहेर महिला  महापंचायत होणार होती.  महिला महापंचायतीत हरियाणा व्यतिरिक्त यूपी, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब आणि दिल्ली येथील लोक आणि शेतकरी सहभागी होणार होते.

मात्र, दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी दिली नाही. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पैलवानांनी महापंचायत आयोजित करून संसदेच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंवर बळाचा वापर केला. तसेच  जंतर-मंतरवरील तंबू, खुर्च्या आणि इतर वस्तू हटवून आंदोलन मोडीत काढले.

महिला कुस्तीपटूंना बळाचा वापर करून रोखण्यात आल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया अत्यंत संतप्त झाला. त्याने ही लोकशाही आहे का? अशी विचारणा करत आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत आणि आमच्याशी अशी वागणूक होत आहे. आम्हाला गोळ्या घाला अशी संतप्त भावना व्यक्त केली.

Pune : पुना सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने रक्तदान शिबिर

 

देशाला पदक जिंकून देणाऱ्या महिला कुस्तीपटूंना पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली; त्यामुळे  संताप व्यक्त करण्यात येत आहे.नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला य़ा घटनेने गालबोट लागले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.