BNR-HDR-TOP-Mobile

Delhi : लोकसभा निवडणूक 2019 ; तारखा जाहीर, देशात ७ टप्प्यात होणार निवडणूका

मतमोजणी २३ मे रोजी होणार; महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात मतदान होणार

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणूकची प्रकिया देशात सात टप्प्यात होणार असून मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे, याची घोषणा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्ली येथे केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद विज्ञान प्रसार येथे सुरु आहे.

यावेळी त्यांनी देशभर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर यंदा ७ टप्प्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. मागील वेळी देशात ९ टप्प्यात मतदान झाले होते.  तर, विद्यमान लोकसभेचा कार्यकाल ३ जूनला संपणार आहे.

 • यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले, गृहमंत्रालयाशी अनेकदा चर्चा झाली. निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्षांची चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी १२ तास चर्चा झाली आहे. यामध्ये परीक्षा आणि सणांचाही विचार केला आहे.

यादीत नावाचा समावेश असल्याबद्दलच्या माहितीसाठी १५९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अंध मतदारांसाठी मतदार यादी ब्रेल लिपीमध्ये असणार आहे. व्हीव्हीपॅट मशीन्स ईव्हीएम मशीन्ससोबत वापरली जाणार आहेत. यंदा देशभरात १० लाख मतदार केंद्रे असून २०१४ च्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे.

 • आजपासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा ईव्हीएममध्ये उमेदवारांचे फोटो असणार आहेत. तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटींग होणार आहे. आचासंहितेचा भंग झालेले कळविण्यासाठी विशेष अॅपची व्यवस्था असणार आहे. तक्रार केल्यापासून १०० मिनिटांत कारवाई केली जाणार आहे. दिव्यांग मतदारांसाठीही विशेष अॅपची सोय केली आहे. दिव्यांग मतदारांसाठी घरातून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची सोय केली असून मतदानाच्या ४८ तास आधी प्रचार बंद होणार आहे.

याचबरोबर देशातील मतदारांची संख्या ९० कोटींहून अधिक असून प्रचाराच्या जाहिरातींवर निवडणूक आयोगाचे लक्ष फेसबुक, ट्विटर, गुगलवरील जाहिरातींवरही राहणार आहे. तसेच पेड न्यूज रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

 • लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून 23 मे ला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला पार पडेल. तसेच 11एप्रिल ,18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे, 19 मे मतदान होईल. महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात मतदान होणार आहे. गोव्यात दोन्ही जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मतदानाचे ७ टप्पे पुढीलप्रमाणे :
पहिला टप्पा – ११ एप्रिलला मतदान, ९१ मतदारसंघ, २० राज्ये,
दुसरा टप्पा – १८ एप्रिलला मतदान, ९७ मतदारसंघ, १३ राज्ये,
तिसरा टप्पा – २३ एप्रिलला मतदान, ११५ मतदारसंघ, १४ राज्ये,
चौथा टप्पा – २९ एप्रिलला मतदान, ७१ मतदारसंघ, ९ राज्ये,
पाचवा टप्पा – ६ मे रोजी मतदान, ५१ मतदारसंघ, ७ राज्ये,
सहावा टप्पा – १२ मे रोजी मतदान, ५९ मतदारसंघ, ७ राज्ये,
सातवा टप्पा – १९ मे रोजी मतदान, ५९ मतदारसंघ, ८ राज्ये.

 • महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया :
  पहिला टप्पा – ७ मतदारसंघ,
  दुसरा टप्पा – १० मतदारसंघ,
  तिसरा टप्पा – १४ मतदारसंघ,
  चौथा टप्पा – १७ मतदारसंघ.

महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात मतदान; तारखा पुढीलप्रमाणे :
# महाराष्ट्रात 11 एप्रिलला सात मतदारसंघांसाठी मतदान
# महाराष्ट्रात 18 एप्रिलला दहा मतदारसंघांसाठी मतदान
# महाराष्ट्रात 23 एप्रिलला चौदा मतदारसंघांसाठी मतदान
# महाराष्ट्रात 29 एप्रिलला 17 मतदारसंघांसाठी मतदान
# पुणे, बारामती, शिरूर व मावळ मतदारसंघासाठी 29 एप्रिलला निवडणूक होणार असल्याची शक्यता

 

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like