Delhi : ‘फास्टॅग’ची अंमलबजावणी पुढच्या वर्षी; 15 जानेवारी 2020 पासून लागू होणार

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने टोल नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी ‘फास्टॅग’ 15 डिसेंबर 2019 पासून सुरु होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ‘फास्टॅग’ लागू करण्यासाठी केंद्र सरकारने एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता याची अंमलबजावणी 15 जानेवारी 2020 पासून होणार आहे. नव्या वर्षातच ‘फास्टॅग’ योजना लागू होणार आहे. ज्यांनी फास्टॅग घेतलेले नाही. त्यांना महिनाभराचा दिलासा मिळाला आहे.

देशातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्यांवर वाहनधारकांना रांगेत बराच वेळ थांबावे लागत होते. यामुळे विनाकारण वेळ वाया जात होता. यावर उपाय म्हणून आणि टोल नाक्यावर वाढणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणार्‍या टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’ची योजना आणली असून ‘वन नेशन वन फास्टॅग’ असे या योजनेचे नाव आहे.

टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांवर तर उर्वरित एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा अंमलात आणली जाणार होती. मात्र, ‘फास्टॅग’चा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्राने फास्टॅग लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलून दिलासा दिला आहे. हि योजना पुढील वर्षी अर्थात 15 जानेवारी 2020 पासून राष्ट्रीय महामार्गावरील ‘फास्टॅग लेन’ असेल, असेही केंद्राने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.