-MPC-TOP-MOST-BANNER-I

Delhi News : 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. 18 वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लसींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘जगात लसीची मागणी होत आहे. जर आज भारतात लशींचं उत्पादन झालं नसतं, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येतं की, भारताला दशकं लागायची. पोलिओसह अनेक लसींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, 2014 मध्ये भारतात लसीकरणाचा वेग 60 टक्केच होता. उत्पादनाचं प्रमाण खूप कमी होतं. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती.

त्याच वेगानं जर लसीकरण झालं असतं, देशाला 40 वर्ष लागले असते. पण, यासाठी सरकारनं मिशन इंद्रधनुष्य सुरु केलं. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे. त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग 60 टक्क्यांवरून 90 टक्के झालं. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला,’ असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.

राज्यांवर सोपवण्यात आलेलं लसीकरणाचं 25 टक्के काम होतं, त्याची जबाबदारीही भारत सरकार घेणार आहे. येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकार नवीन नियमावली लागू करणार आहे. या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्ये मिळून नवीन नियमावली तयार करतील. योगायोग असा की, दोन आठवड्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन ही आहे. 21 जूनपासून देशातील सर्व राज्यातील 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नसल्याचे मोदी म्हणाले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn