Delhi News : ‘कोव्हॅक्सिन’चे उत्पादन मे-जूनपासून दुप्पट  करणार – केंद्र सरकार 

एमपीसी न्यूज – भारत बायोटेकच्या वतीने उत्पादित केली जाणा-या ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे उत्पादन मे-जूनपासून दुप्पट  करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत असून, लसीकरण वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

लस उत्पादन वाढवण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य करणार आहे. ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे आत्ताचे उत्पादन मे-जूनपर्यंत डबल करायचे आहे, तर जुलै-ऑगस्टपर्यंत यामध्ये सहा ते सात पटीने वाढ करण्याचे लक्ष्य असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत महिना 10 कोटी डोस उत्पादित केले जाण्याची शक्यता मंत्रालयाने वर्तविली आहे.

_MPC_DIR_MPU_II

तीन कंपन्यांना लस उत्पादन वाढवण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे. भारत बायोटेक बंगळुरू, मुंबईतील हाफकिन बायो- फार्मास्युटिकल   आणि हैदराबाद येथील इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड या कंपन्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.

त्यापैकी भारत बायोटेक बंगळुरू व मुंबईतील हाफकिन बायो- फार्मास्युटिकल कंपनीला प्रत्येकी 65 कोटी  रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

देशात काही ठिकाणी कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या नवा उच्चांक गाठत आहे. मागील दोन दिवसांपासून देशात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे.

सध्याच्या घडीला देशात 15 लाख 69 हजार 743 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, आत्तापर्यंत 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.