Delhi News : टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीस थेट ट्विटर इंडियाच्या कार्यालयात

एमपीसी न्यूज – दिल्लीच्या विशेष शाखेच्या पोलिसांकडून सोमवारी ‘ट्विटर इंडिया’च्या दिल्ली आणि गुरुग्राम कार्यालयात छापा मारण्यात आला. ‘COVID टूलकिट प्रकरणा’ वरुन ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर आरोप करणारे एक टि्वट केले होते. या टि्वटला खुद्द टि्वटरकडूनच Manipulated Media अर्थात छेडाछाड करणारे टि्वट ठरवण्यात आले होते. संबित पात्रा यांनी त्या टि्वटमध्ये काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड हाताळीत अपयशी ठरले, हे दाखवण्यासाठी त्यांची बदनामी करण्यासाठी टूलकिट बनवल्याचा आरोप केला होता. पण टि्वटरने पात्रा यांचे ते टि्वट ‘मॅन्यूप्युलेटेड मीडिया’ असल्याचे म्हटलं होतं. त्यावरुनच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसने टि्वटरकडे संबित पात्रा आणि अन्य भाजप नेत्यांची टि्वट हटवण्याचा आग्रह केला होता. संबित पात्रा यांनी #CongrssToolkitExposed या हॅशटॅगसह टि्वट पोस्ट केले होते.

याबाबत स्पष्टीकरण देताना, दिल्ली पोलिसांचे हे विशेष पथक नियमित प्रक्रियेचा एक भाग म्हणून ट्विटरला नोटीस देण्यासाठी ट्विटरच्या ऑफिसमध्ये गेले होती. कंपनीच्या एमडीचे प्रत्युत्तर खूप संदिग्ध असल्याने नोटीस बजावण्यास कोण योग्य आहे, हे शोधणे हे आवश्यक होतं, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

मात्र दिल्ली पोलिसांचे पथक ट्विटर इंडियाच्या कार्यालयात पोहचल्यानंतर वर्षभराहून अधिक काळापासून वर्क फ्रॉम होममुळे कार्यालयात कोणीच नसल्याचे त्यांना प्रवेशद्वारावरच सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.