Delhi News : ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे निधन

एमपीसी न्यूज: बिग बॉस या रिॲलिटी शोचे माजी स्पर्धक व खेळाडू असलेले स्वामी ओम यांचे आज निधन झाले. काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला.

बिग बॉसमध्ये असताना स्वामी ओम यांच्यामुळे अनेक वादविवाद निर्माण झाले होते. या सीझनमध्ये त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या अंगावर मूत्र फेकले होते. या कारणामुळे त्यांना शोमधून काढण्यात आले होते. यानंतर त्यांनी दिल्लीमधून लोकसभा निवडणूकदेखील लढवली होती.

63 वर्षीय स्वामी ओम सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी चर्चेत आणि वादांत अडकलेले असायचे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.