Delhi News : देशात लॉकडाऊनची शक्यता? पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वाची बैठक सुरु

0

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद होत आहे. तसेच, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि मनुष्यबळ उपलब्धेबाबत आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत देशात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

जगभरातून भारतातील कोरोना परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार यांनी भारतात दोन आठवड्यांचा लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक सुरु आहे. या बैठकीत देशातील ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि मनुष्यबळ उपलब्धेबाबत आढावा घेतला जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण केले आहे. यामुळे ठिकठिकाणी ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि मनुष्यबळाचा तुटवडा भासत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या व मृतांची संख्या लक्षात घेता देशा – विदेशातून भारतात लॉकडाऊन लागू करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

देशात दररोज चार लाखांच्या आसपास रुग्णवाढ होत असून, सध्या 33.49 लाख सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, दररोज साडेतीन हजार रुग्णांचा मृत्यू होत आहे. देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. एक मे पासून देशात 18 वर्ष वरील सर्वांना लस दिली जाणार आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 15 कोटी 68 लाख 16 हजार 031 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment