Delhi News: ‘सुप्रिम’ निर्णय ! सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी बंधनकारक

एमपीसी न्यूज – सीबीआयच्या तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे. दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायद्यानुसार कोणत्याही प्रकारणाच्या तपासासाठी सीबीआयला संबंधित राज्याची परवानगी असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने सीबीआयच्या तपासासाठी राज्याची परवानगी घेणे बंधनकारक केले होते.

दिल्लीतील विशेष पोलीस स्थापना अधिनियमात अधिकार क्षेत्रासाठी सीबीआयसाठी राज्य सरकारची परवागी घेणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामध्ये म्हटले आहे.

‘या’ आठ राज्यांनी परवानगी घेणे केले होते बंधनकारक !

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकार क्षेत्राबाबत अनेकदा राज्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यापूर्वी झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, मिझोराम, पंजाब आणि केरळ राज्यानेही चौकशी करायची झाल्यास सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले होते.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही सीबीआयच्या तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले होते. आता सर्वोच्च न्यायालयानेही सीबीआय तपासासाठी त्या राज्याची परवानगी घेणे गरजेचे असल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.