Delhi News : दिल्लीत एका दिवसात टाटा मोटर्सची दहा नवीन शोरुम

एमपीसी न्यूज – दिल्लीत (बुधवारी, दि.07) एका दिवसात टाटा मोटर्सची दहा नवीन शोरुम सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी दिल्लीत सात, गुड़गावमध्ये दोन आणि फरिदाबाद मध्ये एका शोरुमचे उद्घाटन करण्यात आले. यासह आता दिल्लीत एकूण शोरुमची संख्या 29 झाली आहे.

टाटा मोटर्सच्या विक्री, विपणन आणि ग्राहक सेवा विभागाचे राजन अंबा म्हणाले, या साली मागील आठ वर्षांतील सर्वाधिक वार्षिक विक्री झाली आहे. त्यानुसार हा शोरुम विस्तार करण्यात आला आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये 69 टक्के विक्री नोंद झाली आहे. एकाच दिवसात दिल्लीत दहा शोरुमचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ‘न्यू फॉरएवर’ उत्पादनांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

_MPC_DIR_MPU_II

नव्यानं सुरू झालेली शोरुम तंत्रज्ञान, प्रगत मशीन आणि ॲटोमोशन याने सुसज्ज आहेत. हि शोरुम ग्राहकांना समाधानकारक अनुभव आणि उत्तम सेवा प्रदान करतील. सेवा विस्तार करण्यावर कंपनीचे लक्ष असून, ग्राहकांना सर्वोत्तम विक्री अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. असे, कंपनीने म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.