India Corona Update : देशात कोरोनाचे 807 युके, 47 दक्षिण आफ्रिका व एक ब्राझीलीयन प्रकार

दहा जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची सर्वाधिक

एमपीसी न्यूज – देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. देशातील काही जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ होत असून दहा जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. दहापैकी आठ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशात कोरोनाचे 807 युके, 47 दक्षिण आफ्रिका व एक ब्राझीलीयन प्रकार सापडल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

राजेश भूषण म्हणाले पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, नागपूर, बंगळुरू व दिल्ली या जिल्ह्यात देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. काही जिल्ह्यांतील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. तसं पाहिलं तर संपूर्ण देश संभाव्य धोक्यात आहे. आयसोलेशन संबंधित योग्य नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.

होम क्वारंटाईन ऐवजी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर जास्त भर देण्यात यावा अशी सूचना भूषण यांनी केली.

संबंधित राज्यातील प्रमुखांशी निरंतर चर्चा सुरू आहे. याठिकाणी चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. प्रामुख्याने आरटीपीसीआर चाचणी करण्यावर भर दिला पाहिजे असे भूषण म्हणाले. सध्या देशातील आठवड्याचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट 5.65 टक्के एवढा आहे.

तर  महाराष्ट्राचा सर्वाधिक 23 टक्के एवढा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत कोणतीही विचारणा केली नसल्याचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

एक एप्रिलपासून देशात 45 वर्षांवरील सर्वजण लस घेण्यासाठी पात्र असतील. लसीकरणासाठी cowin.gov.in यावरुन आरक्षण करता येईल. किंवा लसीकरण केद्रावर जाऊन देखील नोंदणी करता येईल. यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बॅंक पासबुक, रेशन कार्ड घेऊन जाता येईल. 45 वर्षांवरील सर्वांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन यावेळी भूषण यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.