Delhi Crime News : कुस्तीपटू सागर राणा हत्या; सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

एमपीसी न्यूज – कुस्तीपटू सागर राणा हत्येप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुशील कुमारवर दिल्लीच्या एका स्टेडियमवर कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येत गुंतल्याचा आरोप आहे. सुशील बराच काळापासून फरार आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्याऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

कुस्तीपटू सागर राणा हत्येप्रकरणी सुशील कुमार आणि अन्य सहा जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. देश सोडून पळून जाऊ नये म्हणून सुशील कुमारच्या विरोधात लुकआउट नोटिसही जारी करण्यात आली आहे.

सुशीलने मंगळवारी रोहिणी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीपटू सागर राणा (23) याची चार मे रोजी नवी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगच्या बाहेर हत्या झाली होती. याप्रकरणात सुशील कुमारचेही नाव समोर आले होते. मॉडेल टाऊन परिसरातल्या एका फ्लॅटवरून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.