Pune : मानव एकता दिनानिमित्त रक्तदान अभियान व सत्संग समारोहांचे आयोजन

 एमपीसी न्यूज – सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन ( Pune ) सान्निध्यात ‘मानव एकता दिवस’ मुख्य समारोहाचे आयोजन बुधवार, दि.24  रोजी ग्राउंड नं. 2, निरंकारी चौक, बुराड़ी, दिल्ली येथे करण्यात आले आहे. हा दिवस युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांचे परोपकारी जीवन आणि त्यांच्या लोककल्याणकारी भावनेला समर्पित आहे. या कार्यक्रमात दिल्ली व आजुबाजुच्या राज्यांमधून हजारोंच्या संख्येने  भक्त सहभागी होऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे   चाचा प्रतापसिंहजी  यांचे अनमोल प्रवचन श्रवण करतील.
 पुणे झोन मध्ये संत निरंकारी सत्संग भवन,गंगाधाम त्याचबरोबर इतर अठरा ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी मंडळाचे पुणे झोनचे प्रभारी आदरणीय  ताराचंद करमचंदानी यांनी माहिती देताना सांगितले, की  प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अवघ्या विश्वामध्ये विविध ठिकाणी संत निरंकारी मिशनची समाजकल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक स्तरावर आयोजन केले जाईल ज्यामध्ये मानवतेच्या भल्यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत केले जाईल.
पुण्यामध्ये संत निरंकारी सत्संग भवन ,गंगाधाम येथे आयोजित  शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यासाठी ससून,वाय.सी.एम,कमांड अशा विविध इस्पितळांचे प्रशिक्षित डॉक्टर्सची टीम सहभागी होणार आहे. त्याबरोबर इतर राज्यांमध्ये तेथील स्थानिक इस्पितळाचे डॉक्टर्स व नर्स रक्त संकलित करण्यासाठी उपस्थित राहतील. याशिवाय सर्व ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात येईल. रक्तदानाच्या जनजागृतीसाठी मिशनचे सेवादार आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी प्रेरणा देत आहेत.
युगप्रर्वतक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आपले संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित केले; त्यांनी ब्रह्मज्ञानाद्वारे ( Pune ) मानवाला मानवाशी जोडून प्रेम व गोडीगुलाबीने नांदण्याची निर्मळ धारा प्रवाहित केले व प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपले स्थान निर्माण केले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील. त्यांची दिव्य शिकवण वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सत्य ज्ञानाच्या रूपात सर्वत्र प्रवाहित करत आहेत ज्याच्या प्रकाशाने प्रत्येक मानव आपले जीवन सकारात्मक रूपात कल्याणकारी बनवत आहे.
रक्तदान महादान – सेवेचे लक्ष्य महान
 उल्लेखनीय आहे, की युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांनी सन् 1986 मध्ये सुरु केलेल्या रक्तदानाच्या परोपकारी मोहिमेने आता महाअभियानाचे रूप धारण केले असून त्याचा चरमोत्कर्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. या शिबिरांमध्ये आतापर्यंत 13,31,906 युनिट रक्त मानवमात्राच्या ( Pune )भल्यासाठी दिले गेले असून या सेवा निरंतर जारी आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.