BNR-HDR-TOP-Mobile

Delhi: श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सदस्यत्वाची घेतली मराठीतून शपथ

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) लोकसभेत मराठीतून सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. बारणे यांनी मराठीतून शपथ घेताच सभागृहातील अन्य सदस्यांनी बाके वाजविले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारच्या कार्यकाळातील पहिले संसदीय अधिवेशन आज (सोमवार) पासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवीन खासदारांचा शपथ विधी कार्यक्रम घेण्यात आला. हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार नव्या खासदारांना सदस्यत्वाची शपथ देत आहेत.

  • मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग दुस-या वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पहिल्याच दिवशी सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. बारणे यांनी मराठीतून शपथ घेताच सभागृहातील अन्य सदस्यांनी बाके वाजविले. बारणे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या काही खासदारांनीही खासदारकी आणि गोपनियतेची शपथ मराठी भाषेत घेतली.

दरम्यान, शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणे यांनी सुमारे सव्वा दोन लाख मताच्या फरकाने पराभव केला आहे. गेल्या 45 वर्षात पवार कुटुबांला पहिल्यांदाच पराभव पहावा लागला आहे. पवार कुटुंबातील सदस्याचा पराभव करुन बारणे यांनी इतिहास केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.