Delhi: ..तर अमित शहांवर निर्बंध घाला -अमेरिकन आयोगाची मागणी

लोकसभेतील मंजूर नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा अमेरिकन आयोगाकडून निषेध

एमपीसी न्यूज – जर नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अशी मागणी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या अमेरिकन आयोगाने केली आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला देशभरातून तीव्र विरोध करण्यात येत आहे. आसाममध्ये बंद पाळण्यात येत असून मोठ्या प्रमाणात जाळपोळी केली जात आहे. हे विधेयक चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे, असेही अमेरिकन आयोगाने म्हटले आहे. तसेच कॅब संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर अमेरिकेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य प्रमुख नेत्यांवर निर्बंध लावण्याचा विचार करावा, असे अमेरिकेच्या यूएससीआयआरएफ आयोगाने म्हटले आहे.

काल लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक बिल मंजूर करण्यात आले. यावेळी 311 विरुद्ध 80 अशा फरकाने हे बिल लोकसभेत मंजूर झाले. मात्र, हे बिल केवळ राजकीय फायद्यासाठी आणि मुस्लिम समुदायाला टार्गेट करण्यासाठी आणण्यात आले आहे, असा आरोप करत विरोधकांनी या बिलाला कडाडून विरोध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.