Delhi University News : अंतिम वर्षांच्या मुलांसाठी दिल्ली विद्यापीठ होणार 1 फेब्रुवारीपासून चालू

एमपीसी न्यूज : दिल्ली विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न असलेली महाविद्यालये ही 1 फेब्रुवारीपासून चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार अंतिम वर्षाचे विद्यार्थी ज्यांना प्रयोगशाळा वापरायची गरज आहे आणि ज्यांना प्रात्यक्षिके आहेत, त्यांना प्रथम येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

यानुसार विद्यापीठ, विद्यापीठाचे विविध विभाग, केंद्रे आदी चालू करण्याच्या आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षकवर्गाला 1 फेब्रुवारीपासून पूर्णे क्षमतेने कामावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे छोटे छोटे गट करून अंतिम वर्षाची मुले विद्यापीठ, महाविद्यालयांत येऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती ही मात्र सक्तीची केलेली नसून, ज्या विद्यार्थ्यांना यायचे आहे, ते विद्यार्थी येऊ शकणार आहेत.

फक्त अंतिम वर्षाच्या मुलांना येण्याची परवानगी दिली गेली असून इतर वर्गातील मुलांचे वर्ग हे ऑनलाईन माध्यमातूच होणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.