Delhi news: संसदेत जॅमर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसे? शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा लोकसभेत सवाल

एमपीसी न्यूज – संसदेत जॅमर असताना जिओ कंपनीलाच फक्त नेटवर्क कसे? जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का देण्यात आली. जिओचा मोबाईल नेटवर्क जॅमरच्या बाहेर आहे का, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहे? असे सवाल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केला.

खासदार बारणे म्हणाले, संसदेचे कामकाज सुरू असताना कोणाचेही फोन लागू नयेत यासाठी जॅमर लावले जाते. भारत सरकारची बीएसएनएल आणि एमटीएल कंपनी आहे. या कंपनीला देखील जॅमर आहेत. देशभरात या कंपनीचे नेटवर्क व्यवस्थित चालत देखील नाही.

लोकसभेत बीएसएनएल, एमटीएलचे नेटवर्क चलत नसताना फक्त जिओचे नेटवर्क येत आहे. या कंपनीला जॅमरच्या बाहेर ठेवले आहे का, हे योग्य नाही. जिओ कंपनीला सपोर्ट केले जात आहे. त्यांच्यावर मेहरबानी का दाखविली जात आहे. जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट का देण्यात आली.

जिओचा मोबाईल नेटवर्क जॅमरच्या बाहेर का आहे, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान का आहे? असे विविध सवाल खासदार बारणे यांनी लोकसभेत उपस्थित केले. त्यावर पीठासीनावर विराजमान असलेल्या रमादेवी यांनी याबाबत अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेतील, असे सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.