Delta Plus News : डेल्टा प्लससाठी केंद्राची नवी गाइडलाईन ; 8 राज्यांना सतर्कतेचा इशारा

एमपीसीन्यूज : डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले असून यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डेल्टा प्लस व्हेरिएंटसाठी नवीन गाइडलाईन जारी केली असून देशातील 8 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 8 राज्यातील मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे. यामध्ये राज्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटला रोखण्यासाठी कडक पाऊले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सरकारी आकड्यानुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 51 प्रकरणे आहे. त्यामुळे देशातील 8 राज्यातील 10 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रात आढळून आली असून, येथे रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्यानंतर मध्यप्रदेश आणि केरळ राज्यांचा समावेश आहे.

देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे प्रकरणे वेगाने वाढत आहे. त्यामुळे याला रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरणाची गती वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने संबंधित राज्यांना दिले आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडूचा राज्यांचा समावेश आहे.

‘या’  राज्यांमधील 10 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

तामिळनाडू – मदुरै, कांचीपुरम आणि चेन्नई, राजस्थान – बिकानेर, कर्नाटक – म्हैसूर, पंजाब – पटियाला आणि लुधियाना, जम्मू-काश्मीर – कटरा, हरियाणा – फरीदाबाद, गुजरात – सुरत, आंध्र प्रदेश – तिरुपती.

काय आहे सरकारची गाइडलाईन 

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेलया राज्यांत किंवा जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी व लोकांच्या हालचालीला नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.

डेल्टा प्लस प्रकरणे आढळलेल्या ठिकाणी त्वरित कंटेंटमेंट झोन तयार करावेत. तिथे निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे.

कोरोनाबाधीतांचे नमुने तातडीने भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक कन्सोर्टिया (INSACOG) च्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवावेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.