Punawale News : अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष, पुनावळेतील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुनावळेतील सावता माळी मंदिराजवळील जमीन क्रमांक 40/1, 40/2/1 अ आणि  40/2/2 अ मिळकतीमध्ये (Punawale News) पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकादेशीररित्या अनाधिकृतपणे बांधकाम केले आहे.  या अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांच्या जीवीतास धोका असल्याने हे तत्काळ बांधकाम पाडून टाकावे अशी मागणी उमेश भामरे यांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांना निवेदन दिले आहे. त्यात भामरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटील बनला आहे. त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार दिसते. पालिका बांधकाम परवाना विभागातील बीट निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामे जोरात सुरु आहेत. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. अनधिकृत बांधकाम झाल्यावर त्यावर कारवाईसाठी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय केला जातो. त्यामुळे सुरुवातीलाच अनाधिकृत बांधकाम होवू नये खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. पण, तसे होताना दिसत नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे.

 

Pimpri News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे ‘निधी आपके निकट’ कार्यक्रमाचे आयोजन

अनधिकृतपणे होणा-या बांधकामुळे शहराचा बकालपणा वाढत आहे. याचेही प्रशासनाला काही सोयरसुतक दिसत नाही. महापालिकेच्या हद्दीतील पुनावळेतील सावता माळी मंदिराजवळील जमीन क्रमांक 40/1, 40/2/1 अ आणि  40/2/2 अ मिळकतीमध्ये पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता (Punawale News) बेकादेशीररित्या अनाधिकृतपणे बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांच्या जीवीतास धोका असल्याने हे बांधकाम तत्काळ पाडून टाकण्यात यावे. बिनधास्तपणे सुरु असलेले अनधिकृत बांधकाम महापालिका अधिका-यांना दिसत कसे नाही, हा मोठा प्रश्न आहे. अनधिकृत बांधकाम धारक आणि महापालिका अधिका-यांमध्ये काही साटेलोटे आहे काय, अशी शंका येत असल्याचे भामरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.