Pimpri : उद्योगधंद्याबाबतचे धोरण ठरविण्याची व्यापारी संघटनेची उद्योगमंत्र्यांकडे मागणी 

एमपीसी न्यूज – एमआयडीसीच्या  भागात जे काही छोटेमोठे धंदे आहे. त्याच्या वरती वीजेचे दर भरमसाठ वाढलेले आहे. वीजेचे दर कमी करावे, याचा परिणाम हा उद्योगधंद्यावर होत आहे. त्यामुळे योग्य ते उद्योजकांचे धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, प्रत्येक कंपनीमध्ये काही भाडेकरु आहेत. हे भाडेकरु न ठेवण्याचे आदेश दिलेले आहे. हे भाडेकरु नसेल तर छोटे उद्योजक मोठ्या कंपन्यावरती अवलंबून आहेत. त्यांना जागा नसेल तर त्यांचे उद्योग बंद पडणार आहे, याबाबतीत विचार करावा. भाववाढीमुळे कामधंदे कमी झालेले आहेत. तरी लहान मोठ्या ब-याच उद्योजकांनी उद्योगासाठी बॅंकेकडून कर्ज घेतलेले आहे. तरी वीज नसल्यामुळे त्याचे व्याज व हफ्ते कसे द्यावे हे महत्वपूर्ण प्रश्न उद्योजकांसमोर आहे.

तसेच प्रत्येक उद्योगधंद्यावर जीएसटी लादली गेली आहे. त्यामुळे फर्निचर बनविणारे उद्योगधंदेवाल्यांना मोठा प्रश्न पडला आहे की, जीएसटी लावून मटेरियल खरेदी करावी विकताना मात्र ग्राहक जीएसटी लावलेला माल विकत घेताना नकार देतात. तर आज धंदे कसे करावे व इतर राज्यातून येणारे माल आपल्या भागात भरपूर फर्निचर व फेरीवाले माल रस्त्यावर जीएसटी न लावता विकतात त्यांना जीएसटी लागत नाही का असा प्रश्न ही उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.