Kudalwadi : कुदळवाडी चिखलीतील रस्त्यांवर नो-पार्किंगचा फलक लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज –  कुदळवाडी, चिखली भागातील रस्त्यांच्या कडेला नो – पार्कींगचे फलक लावण्यात यावेत अशी मागणी यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुदळवाडी, चिखली भागातील कुदळवाडी ते मोई रस्ता तसेच चिखली ते मोशी रत्याच्याकडेला मालवाहतूक करणारे मोठ-मोठे ट्रक विनापरवानगी ट्रकमालक लावत आहेत. दोन्ही बाजूला वाहने उभी केल्यामुळे रस्ता अरुंद होत असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.  तसेच त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.

याबाबत स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी वारंवार वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा केला. परंतू, वाहतूक विभागातील अधिकारी रस्त्याच्या बाजूला नो-पार्कींग फलक नसल्यामुळे कारवाई करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या परिसरातील कुदळवाडी, चिखली भागातील रत्यांच्या कडेला नो – पार्कीगचे फलक लावण्यात यावेत असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.