Pune News : चिकन, मटण, मासळीला मागणी वाढली

गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे 10 ते 12 टन, खाडीची सुमारे 400 ते 500 किलो तर नदीच्या मासळीची 500 ते 700 आवक

एमपीसी न्यूज – पुण्यात चिकन, मटण व मासळीला मागणी वाढली आहे. मासळीची आवक वाढल्याने मागणीही चांगली आहे. सर्वच मासळीच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चिकनचे दर टिकून आहेत. इंग्लिश अंड्याच्या शेकड्याच्या दरात ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली आहे.  गावरान अंडी आणि मटणाचे दर  स्थिर आहेत.

गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची सुमारे 10 ते 12 टन, खाडीची सुमारे 400 ते 500 किलो तर नदीच्या मासळीची 500 ते 700 आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला व  सिलनची सुमारे 10 ते 12 टन आवक झाली, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलो भाव) :

 पापलेट : कापरी : 1300, मोठे 1000, मध्यम : 550-750, लहान 440- 480, भिला :  320-360, हलवा : 440-480, सुरमई : 480-550, रावस : लहान 550,  मोठा : 800, घोळ : 550, भिंग : 320, करली : 240-280, करंदी : 140-160, सोललेली 400, पाला :  1100-1200, वाम :  480, मोठी 550, ओले बोंबील : 120, कोळंबी : लहान 280,  मध्यम 400,  मोठे 480, जंबोप्रॉन्स : 1000,  किंगप्रॉन्स : 550, लॉबस्टर : 1000, मोरी : 360, मांदेली : 120-140, राणीमासा : 160, खेकडे  : 180-200, चिंबोर्‍या : 480.

खाडीची मासळी :
सौंदाळे : 280, खापी : 200-240, नगली : 400, तांबोशी :400- 480, पालू : 280, लेपा : 200,  शेवटे : 200, बांगडा : लहान 200 , मोठे 330, पेडवी : 100, बेळुंजी : 160,  तिसर्‍या : 280,  खुबे : 140, तारली : 160 नदीची मासळी : रहू : 160, कतला : 200, मरळ : 480 शिवडा : 280, खवली : 280, आम्ळी : 160, खेकडे : 200 वाम : 550

 चिकन :
चिकन : 180, लेगपीस : 220 जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 280. अंडी : गावरान : शेकडा : 660 डझन : 90 प्रति नग : 7.5, इंग्लिश : शेकडा : 580 डझन : 72 प्रतिनग : 6.

मटण :
बोकडाचे : 640 बोल्हाईचे : 640 खिमा : 640, कलेजी : 640.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.