Disciplinary action: चतुःशृंगी पोलीस ठाणे व ससून प्रशासना विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवूनही दोन महिन्यात कोणताच प्रतिसाद न दिल्याने चतुॎःश्रुंगी पोलीस ठाणे प्रशासान व ससुन रुग्णालय प्रशासनाविरोधात (Disciplinary action) शिस्त भंगाची कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी राज्य माहिती आयोगाकडे अर्जाद्वारे केली आहे.

चतुश्रृंगी पोलीस ठाणे येथे पिडीत शेतकरी अमृता देशमुख यांनी माहिती अधिकाराखाली अर्ज केला असून त्यामध्ये त्यांनी 19 जानेवारी 2021 ते आज अखेर पर्यंतच्या पोलीस तक्रारींची माहिती, तसेच पोलीस ठाण्यातील विजय पाचपुते व निता पाचपुते यांची संपूर्ण माहिती मागवली होती. हा अर्ज अर्जदार अमृता देशमुख यांनी 27 जुन 2022 रोजी केला होता मात्र त्याला कोणताच प्रतिसाद चतुश्रृंगी पोलिसांनी दिलेला नाही.

Dr. Sanjay shinde: केवळ घरात नाही तर प्रत्येकाच्या मनात तिरंगा स्थापित झाला पाहिजे – डॉ.‌ संजय शिंदे

तसेच पुण्यातील ससुन रुग्णालयाची संपूर्ण माहिती मागविणारा अर्ज माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनीही 21 जून 2022 रोजी केला होता.(Disciplinary action) यात त्यांनी 2020 ते 2022 या कालावधीत शासनाकडून रुग्णालयाला मिळणारा निधी, कोवीड 19 च्या कालावधीत निधीची तपशीलवार माहिती,शासनाकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या साहित्यांची माहिती, डॉक्टरांना मिळणाऱ्या योजना अशा विविध बाबींची माहिती मागवली होती.

 

तरी दोन्ही अर्जांना दोन महिने उलटले तरी दोन्ही प्रशांनाकडून अर्जदारांना मेल, पत्र किंवा फोन वरून कोणतेच उत्तर आलेले नाही.(Disciplinary action) संबंधित प्रशासन हे उत्तर देण्यास उदासीन असल्याने त्यांच्यावर कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी विनंती राज्य माहिती आयोगाकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.