Pimpri : फॅन्सी फटाक्यांना मागणी 

एमपीसी  न्यूज –  आठवड्यावर आलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणाऱ्या दिव्यांच्या असंख्य प्रकारांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दुपारपासूनच बाजारात नागरिक गर्दी करताना दिसत आहे. फॅन्सी आणि आतषबाजी करणाऱ्या फटाक्‍यांची मागणी वाढली आहे.

_MPC_DIR_MPU_II

दिवाळीत बच्चे कंपनीला विशेष आकर्षण असते ते फटाक्‍यांचे… यंदा फटाक्‍यांच्या किमतीत वाढ झाली असली तरीही नागरिकांचा फटाके खरेदीचा उत्साह कायम आहे. मात्र, मोठा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांची मागणी कमी झाली असून, फॅन्सी आणि आतषबाजी करणाऱ्या फटाक्‍यांची मागणी वाढली आहे. बाजारात यंदा फॅन्सी फटाक्‍यांची क्रेझ आहे. सर्वच कंपन्यांनी फटाक्‍यांच्या पॅकिंगकडे विशेष लक्ष दिले आहे. बॉक्‍सवर सेलिब्रिटींची छायाचित्रे आहेत.१२ स्टार, क्रॅकलिंग, १२० शॉट्स्, ६० शॉट्स्, गुड‌िया अनार, सायरन आवाज, म्युझिक मेला, तीन साऊंड रॉकेट, पाच फुटी फुलझडी, पॉपिन्स, रॉबीन हे प्रकार पाहायला मिळतात. लहान मुलांसाठी यंदा सिंघम बंदूकचे आकर्षण आहे. दहा रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत बंदुकीची किंमत आहे.

महागाईने फटाक्‍यांच्या किमतीत सुमारे 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांनी आवरता हात घेतलेला नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. होलसेल बाजारात स्वस्तात मिळणाऱ्या फटाक्‍यांमुळे तेथे गर्दी होत आहे. भुईचक्राच्या बॉक्‍सची किंमत 50 ते 350 रुपयांपर्यंत आहे; तर पाऊस आणि रॉकेट व पॅराशूट रॉकेटची किंमत 60 ते 400 रुपयांपर्यंत आहे. पॅराशूट रॉकेटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.