Chinchwad : मासे विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी शरीर संबंध ठेवण्याची अघोरी मागणी

सराईत गुन्हेगार दिरावर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘माझी बायको जिथे मासे विक्रीचा व्यवसाय करते, तिथे तुला मासे विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर तुला माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील’ अशी अघोरी मागणी करणा-या सराईत गुन्हेगार दिरावर आणि त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता चिंचवड परिसरात घडला.

याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 19) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादी महिलेचा दीर आणि त्याच्या दोन मित्रांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 509, 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी दिरावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा एक, फसवणुकीचा एक आणि मारहाणीचा एक असे तीन गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी महिला सार्वजनिक शौचालयात शौचाला जात असताना आरोपी दिराने तिला अडवले. ‘माझी बायको जिथे मासे विक्रीचा व्यवसाय करते, तिथे तुला मासे विक्रीचा व्यवसाय करायचा असेल तर तुला माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेवावे लागतील’ अशी त्याने महिलेकडे मागणी केली.

यासाठी महिलेने नकार दिला असता त्याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याच्या दोन मित्रांसोबत घरी येऊन फिर्यादी आणि तिच्या नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.