Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली,  कराड व कोयना धरणक्षेत्रामध्ये  मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोल्हापूर शहर व आजूबाजूची गावे, सांगली, वाळवा, शिराळा व पलूस या तालुक्यामध्ये तसेच इंचलकरजी या भागात पावसाने थैमान घातले आहे. ऑगस्ट महिन्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी  आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

शहराच्या काही भागामध्ये पंचगंगा नदीच्या  महापुराचे पाणी नागरीवस्तीत घुसल्यामुळे हजारो नागरीकांचे नेसत्या वस्त्रानिशी स्थलांतर करावे लागले आहे. त्यांच्या घरातील दैंनदिन गरजेच्या चीजवस्तू, भिजल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.  ब्रह्यनाळ ता. पलूस येथील महापुरात बाहेर काढताना १२ नागरिकांना बोट उलटून जलसमाधी मिळाली आहे. जरी पूर ओसरला तरी पुरात  या नागरीकांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्याने लगेचच त्यांना सर्वसामान्य जीवन सुरु करता येणार नाही. सरकारी यंत्रणा त्यांना मदत करीत आहे. परंतु ती पुरेशी नाही. त्यामुळे हे सर्व नागरिक आपलेच बांधव आहेत मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे.  या नागरीकांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पक्षीय बलाबलनुसार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ३६ सन्मानीय नगरसदस्य असून २ नामनिर्देशित सदस्य  असे एकूण ३८  नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सन्मानीय  नगरसेवक  त्यांचे  ऑगस्ट  महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या ३८ नगरसदस्यांचे  ऑगस्ट महिन्याचा  मानधनाचा एकत्रित रकमेचा धनादेश देण्यात यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like