Maval News : जांभूळ येथील रेल्वे भुयारी मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी

एमपीसी न्युज – पुणे-लोणावळा लोहमार्गावर जांभूळ गेट क्रमांक ४७ येथे मागील वर्षभरापासून भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. यामुळे परिसरातील गावांना काही किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. हा मार्ग गर्दीचा असल्याने वृद्ध नागरिक आणि रुग्णांसाठी तो धोकादायक ठरत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाकडून भुयारी मार्गाचे काम पुढील १५ दिवसात करून मार्ग खुला करावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन मध्य रेल्वेच्या पुणे मंडळाचे मुख्य अभियंता आशिष शर्मा यांना अंदर मावळ विकास कृती समिती व ५० गावातील रहिवाशांच्या वतीने टाकवे बुद्रुक येथील राजू श्रीरंग शिंदे व दत्ता घोजगे यांनी दिले

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जांभूळ गेट क्रमांक ४७ वर भुयारी मार्ग काम चालू आहे सदर काम गेल्या एक वर्षापासून संथ गतीने चालू आहे तरी अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे आमच्या ‘परिसरातील ५० गावाचे नागरिक दळणवळणासाठी खूप अडचणीतून येत आहे या परिसरात ५० छोटे मोठे उद्योग कारखानदारी आहे अनेक विद्यार्थी कामगार शेतकरी यांना जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही.

Vadgaon Maval : संविधान दिनानिमित्त प्रस्ताविकेचे भाजपाच्यावतीने सामूहिक वाचन

वडगावला जाण्यासाठी सध्या कान्हे गेट क्रमांक ४५ वरून पाच किलो मीटरचा वळसा घालावा लागत आहे व गेट क्रमांक ४५ वर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे दोन दोन किलो मीटर पर्यंत गाड्या रांग लागतात त्यामध्ये इमर्जन्सी पेशंट, विद्यार्थी कामगार, अंबुलन्स यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

येत्या पंधरा दिवसात लवकरात लवकर गेट क्रमांक ४७ भुयारी मार्गाचे काम करावे व वाहतुकीसाठी खुला करावा अशी विनंती करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात कार्यवाही न झाल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.