Pune : पुणे शहरात मेट्रोला मागणी वाढतीच

एमपीसी न्यूज – सध्या पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाचे काम जोरात सुरू आहे. या नवीन वर्षातच मेट्रो शहरात धावणार असल्याचा विश्वास मेट्रोचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. मेट्रोला पुण्याच्या चारही दिशांतून मागणी वाढत आहे.

मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून, कर्वे रस्त्यावरील 5 कि. मी. प्रवास जून 2020 पर्यंत सुरू होणार आहे. आरटीओ आणि येरवडा हा दुसरा मार्ग डिसेंबर 2020 पर्यंत सुरू होणार आहे. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग इलिवेटर होऊ शकत नसल्याने येथे भूयारी मार्ग करण्यासाठीचा डीपीआर तयार करण्यासाठी, चांदणी चौक ते वनाज मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी संबंधितांना 32 लाख रुपये देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पुणे शहरातील सुमारे 82 किमी मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्याबाबत मेट्रो अधिकारी, महापालिका अधिकारी, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात चर्चा झाली. दरम्यान, वनाजपर्यंत आलेल्या मेट्रोला चांदणी चौकातून महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीपर्यंत मेट्रो नेण्याचे नियोजन आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.