Pimpri News : बनावट फेसबुक अकाउंटवरून अकाउंटधारक व्यक्तीच्या मित्रांकडे पैशांची मागणी
एमपीसी न्यूज – बनावट फेसबुक अकाउंट तयार करून मूळ अकाउंटधारक व्यक्तीच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 15) रात्री एच ए कंपनी, पिंपरी येथे घडला.
दिलीप किसन तनपुरे (वय 51, रा. एच ए कॉलनी, संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॅनरा बँक खातेधारक (10002593397), गुगल पे नंबर (8441891871), व्हाट्सअप नंबर (9690822768) वरील अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपीने फिर्यादी तनपुरे यांचे फेसबुक अकाऊंट क्लोन केले. त्याद्वारे तनपुरे यांच्या एका मित्राला मेसेज करून कॅनेरा बॅंकेच्या खात्यावर 10 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांच्या कंपनीत काम करणाऱ्या दोन सहकाऱ्यांनाही प्रत्येकी गुगल पेवर 10 हजार रुपये पाठविण्यास सांगितले.
तसेच आरोपीने स्वतःच्या व्हॉटस्ऍप क्रमांकावर डीपीला फिर्यादी यांचा फोटो ठेवून फसवणूक केली.
पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.