-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bhosari News : मुंबईमध्ये नवीन घर बांधण्यासाठी व गाडी घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी

सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या कारणांवरून विवाहितेचा छळ केला. तसेच मुंबईमध्ये नवीन घर बांधण्यासाठी व गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे देण्याची मागणी केली. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. त्यानुसार सासरच्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 सप्टेंबर 2019 पासून 20 मार्च 2021 या कालावधीत नवी मुंबई तसेच जत जि. सांगली येथील वाळेखिंड येथे घडला आहे.

सुनील जालिंदर शिंदे (वय 34), जालिंदर लक्ष्मण शिंदे (वय 58), अमोल जालिंदर शिंदे (वय 30) आणि दोन महिला  सर्व रा. नवी मुंबई यांचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 26 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात 16 जून 2019 रोजी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी विवाहितेला ‘तुला काम येत नाही. तुला स्वयंपाक येत नाही. गॅसवर स्वयंपाक करू नको. स्टोव्हवर कर’. असे वारंवार टोचून बोलून ‘तु पागल आहेस. तु आम्हाला पसंत नाही. तु घटस्फोट दे’. असे वारंवार बोलून फिर्यादी यांचा छळ केला. तसेच विवाहितेकडे माहेरहून मुंबईमध्ये नवीन घर बांधण्यासाठी व गाडी घेण्यासाठी पैसे घेऊन येण्याची मागणी केली. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. फिर्यादी महिलेचा मोबाईल नंबर आरोपींनी ब्लॉकलिस्ट मध्ये टाकला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn