Dehuroad : फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेकडे पैशांची मागणी

एमपीसी न्यूज – फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच या मागणीवरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकांत पुरुषोत्तम बाईस्कार, पुरुषोत्तम जयराम बाईस्कार, शिलाबाई पुरुषोत्तम बाईस्कार, स्वाती सुनील कोठाळे, सुनील काशिनाथ कोठाळे (सर्व रा. प्राधिकरण निगडी) लक्ष्मण एकनाथ शिंगाडे (रा. लोणी गुरव, बुलढाणा) अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या मंडळींची नावे आहेत. याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करून तिला त्रास दिला. महिलेला माहेरच्या मंडळींनी लग्नात काहीच दिले नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. या कारणावरून विवाहितेला उपाशी ठेवून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. किरकोळ कारणावरून भांडण काढून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.