Akurdi : शहरामध्ये पालिकेच्या वतीने पाळणाघर सुरू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये पाळणाघर सुरू करण्यात यावे, अशी मागणी अ प्रभाग समितीच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून गरोदर व  प्रसुती झालेल्या महिलांना जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यासारख्या योजनांचा लाभ दिला जात आहे. पण पुणे महापालिकेने अशा महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांसाठी पाळणाघर चालू करुन ते माफक दरात चालविले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पाळणाघर सुरू करावे, असे गोरखे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील महिला नागरिक या नोकरी, व्यवसाय या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यांच्या बालकांना कालावधीत सांभाळण्यासाठी विशेष अशी सोय नसते. पिंपरी-चिंचवडमध्ये खाजगी, सरकारी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या भरपूर असून त्यांच्या बालकांना पाळणाघराची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.