Kudalwadi : कुदळवाडी-चिखली परिसरात रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्याप्रमाणे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. चिखली भागातील कुदळवाडी, मोई फाटा ते पवारवस्ती उड्डाणपूल तसेच मोशी ते शेलारवस्ती रोडवरील रस्ता दुभाजकावर महानगरपालिकेने वृक्षांची लागवड केली आहे. मात्र, लावलेल्या झाडांपैकी काही झाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. त्याकडे मनपाने दुर्लक्ष केले. मोशी ते शेलारवस्ती रोडवरील रस्ता दुभाजकावर महानगरपालिकेमार्फत पुन्हा झाडे लावण्याचा उपक्रम घ्यावा, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाळा आहे. मनपाने लावलेल्या झाडांपैकी जी झाडे जळून गेली आहेत. त्यठिकाणी पून्हा वृक्ष लागवड केली तर, त्या जागेवर पावसामुळे झाडांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे मनपाने कुदळवाडी, मोई फाटा ते पवारवस्ती उड्डाणपूल तसेच मोशी ते शेलारवस्ती रोडवरील रस्ता दुभाजकावर महानगरपालिकेमार्फत पुन्हा झाडे लावण्याचा उपक्रम घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.