Bopkhel News: मुख्य रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छता गृह उभारण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेल, रामनगर, गणेशनगर भागातील मुख्य रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छता गृह ( मुतारी) उभारण्याची मागणी भोसरी पोलीस स्टेशन शांतता कमिटीचे सदस्य भाग्यदेव घुले यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात घुले यांनी म्हटले आहे की, बोपखेल, रामनगर, गणेशनगर मुख्य रस्त्यावर एकही सार्वजनिक स्वच्छता गृह (मुतारी) नाही. त्यामुळे नागरिकांची, पाहुणे मंडळींची अडचण होते. त्यामुळे रस्त्यावर लघुशंका केली जाते. त्यामुळे शहरातील मोकळ्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य होते. त्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृह (मुतारी) उभारण्याची आवश्यकता आहे.

बोपखेल गावांमध्ये येत असताना 3 किलोमीटरच्या रस्ताभागात स्वच्छता गृह उभारावे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत होईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामे होत असताना बोपखेलवर कुठे तरी दुजाभाव होत आहे अशी स्थानिक नागरिकांची भावना आहे. त्यामुळे बोपखेलगावातील विकासकामांवर लक्ष द्यावे अशी विनंती घुले यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.