Pimpri : मासुळकर कॉलनीतील दुर्गंधी दूर करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 9 मासुळकर कॉलनीमधील हनुमान मंदिरासमोर दुर्गंधी पसरली आहे. औषध फवारणी नाही. ही दुर्गंधी दूर करावी अशी मागणी  भोसरी विधानसभा विभाग प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी क प्रभाग अधिकारी अण्णा बोदडे यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून दुषित पाण्याचा साठा साचला जातो. अनेक वेळा अधिका-यांना  तक्रार देऊन सुध्दा अजून काही कार्यवाही नाही. त्यामुळे रोगराई पसरून आजाराला आमंत्रण मिळाले आहे. तरी या भागातील दुर्गंधी दूर करावी असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी  प्रा. दत्तात्रय भालेराव, चंद्रकांत कणसे, कुणाल जगनाडे, गणेश जाधव, संभाजी मासुळकर, विपुल टेरे, अनिल कोकिरकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.