Pune Crime News : 5 लाखाच्या बदल्यात 15 लाख दिले तरी 8 लाखाची मागणी, खासगी सावकाराला अटक

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीर सावकारी प्रकरणात एकाला (Pune Crime News) अटक केली. पाच लाखाच्या कर्जाच्या बदल्यात चार वर्षात 15 लाख रूपये दिल्यानंतरही आणखी 8 लाखांची मागणी करत होता.

दत्ता गोकुळ वाघमारे (वय २९, रा. चंदननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात एका ३८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांनी संशयित वाघमारे याच्याकडून 2018 मध्ये 5 लाख रुपये व्याजाने घेतले होते. चार वर्षात त्यांनी वाघमारे यांना तब्बल 15 लाख दिले. तरीही वाघमारे (Pune Crime News) त्यांच्याकडे आणखी 8 लाखांची मागणी करत होता. याच पैशासाठी त्याने शेख यांच्या घरात शिरून त्यांना दमबाजी केली. मुद्दल व व्याजाचे पैसे देण्याच्या कारणावरून त्यांच्यासह कुटुंबियांना शिवीगाळ केली. या त्रासामुळे त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली होती. तक्रारीवर चौकशीकरून गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारने वाघमारेला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.