Chinchwad : गणेशोत्सवात विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी 

एमपीसी   न्यूज –   शहरात नुकतेच गणपती बाप्पा आगमन झाले आहे. सर्वत्र गणेशोत्सव मोठा धार्मिक सण म्हणून साजरा होतो. गणेशोत्सवाच्या काळात विद्युतपुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी  महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी महावितरण अभियंता शिवाजी वायफळकर यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सवात सर्वात मह्त्वाचे काम महावितरण प्रशासनाचे असते .गेल्या वर्षी महावितरण कडून काही ठिकाणी नागरिकांना  हलगर्जी पणा जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी होती. म्हणून या वर्षी महावितरण प्रशासनाने शहरात विद्युत पुरवठा सुरळीत व कायम राहील याची दक्षता घ्यावी व पुढील दहा दिवसांत नागरिकांची तक्रारच येणार नाही याची काळजी घ्यावी व कदाचित तक्रार आलीस तर त्वरित दखल घेऊन काम करावे. यासाठी पुढील दहा दिवसाचे शहरात विदुयत पुरवठा सुरळीत ठेवण्याचे योग्य नियोजन करावे व जनतेस गणेशोत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे.

यावेळी भारती विनोदे, सौरभ शिंदे,गणेश बच्चे,सौरभ कर्नावट आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.