Pimpri : शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड करावा, अशी मागणी अपक्ष गटनेते कैलास बारणे यांनी आयुक्तांकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. हा पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्याने विस्कळीत होत आहे. याबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून त्यांच्या पाण्याबाबतच्या तक्रारींना सर्वच नगरसेवकांना सकाळपासून तोंड द्यावे लागत आहे.

पवना धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांपेक्षाही कमी असल्यामुळे पिंपरी- चिंचवडमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय दि. ६ मेपासून घेण्यात आला होता. दिवसाआड पाणी मिळत असूनही नागरिक समाधानी होते. पाणीपुरवठा सुरळीत होईल व नागरिकांचा रोष नव्हता. दि. ६ मे ला घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणेच शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.