Nigdi News : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी विवाहितेकडे 25 लाख रुपयांची मागणी

निगडी आणि चिखलीत स्त्री अत्याचाराचे तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाण्यात एक आणि चिखली पोलीस ठाण्यात दोन महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 25 लाख रुपये देण्याची मागणी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे केली. त्यावरून तिचा छळ केल्याचा प्रकार आकुर्डी येथे घडला.

चिखली येथे चारित्र्यावर संशय घेऊन छळ केल्याचा दुसरा प्रकार घडला आहे. तर शिवीगाळ आणि मारहाण करून विवाहितेचा छळ केल्याचा तिसरा प्रकार देखील चिखली येथे घडला आहे.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पती, सासू, सासरे, नणंद यांनी मिळून विवाहितेकडे 25 लाख रुपयांची मागणी केली. त्यावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चिखली पोलीस ठाण्यात स्त्री अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणात पती, सासू, सासरे, दोन दिर, दोन जाऊ, नणंद आणि नंदावा यांनी मिळून विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला असल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात पती आणि सासूने मारहाण, शिवीगाळ करत वाईट वागणूक देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद विवाहितेने दिली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.