Pune Lonavala local : पुणे लोणावळा लोकलची संख्या वाढविण्याची मागणी

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन पूर्णपणे उठल्याने (Pune Lonavala local) आता शाळा, कॉलेज, कंपन्या, खाजगी अस्थापना व सरकारी कार्यालये पूर्ण चालू झाली आहेत. कर्मचारी विद्यार्थी आणि प्रवासी संख्या वाढली आहे. खाजगी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येऊन वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणे लोणावळा लोकलच्या फे-या वाढवाव्यात. याचा पुणे लोणावळा मार्गावरील नागरिकांना फायदा होईल तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडेल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी केली आहे.

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त शहरात 3 लाख घरांवर फडकणार तिरंगा

पीएमपीएमएलची बस व्यवस्था ही टप्पा वाहतूक पद्धतीने होत असल्याने त्याचा भुर्दंड नागरिकांना बसतो. पुणे लोणावळा रेल्वे प्रवास तुलनेने स्वस्त आणि खात्रीशीर असल्याने रेल्वे प्रशासनाने (Pune Lonavala local) यावर त्वरित निर्णय घेऊन प्रवाश्यांना लोकलची संख्या पूर्ण क्षमतेने वाढवून दिलासा द्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.