Pune : बँकिंग व शॉपिंग मॉल क्षेत्रात काम करणा-या महिलांना संरक्षण देण्याची मागणी

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांचे राष्ट्रपती कोविंद यांना निवेदन

एमपीसी न्यूज – बँकिंग व शॉपिंग मॉल्स क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी यांना त्वरित संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. या बाबतचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोशयारी आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल यांना देण्यात आले आहे.

निवेदनात सांगितले आहे की, आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करत आहे. त्याबरोबर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न सुद्धा उपस्थित होतो. महिलांना सुरक्षितता आणि काम करावयास चांगले निकोप वातावरण मिळणे गरजेचे आहे. शॉपिंग मॉल व बँकिंग अशा अनेक क्षेत्रात आज महिला काम करत आहे. काम करावयाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे वर्तन अयोग्य असेल तर त्याला कामावरून काढण्यात यावे.

महिलांना रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवू नये. शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या महिलांना संरक्षण मिळावे. त्यांना रात्री आठ नंतर थांबावे लागू नये. उशिरा निघाल्यामुळे महिलांना घरी पोहोचण्यास वेळ लागतो. रस्त्यावरील टवाळखोर मुलांचा त्रास होतो. मॉलमध्ये एखाद्या व्यक्तीचे वर्तन महिलांबाबत अयोग्य असेल तर त्याची सखोल चौकशी करावी व त्याला कामावरून काढण्यात यावे. महिलांवरील होणा-या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे, याबाबत चिंता व्यक्त करीत त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत.

१) महिला पोलिसांची बँकिंग व शॉपिंग मॉल क्षेत्रात रोज गस्त असावी.

२) महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण अनिवार्य करावे.

३) साध्या वेशातील महिला पोलिसांची गस्त असावी.

४) महिला पोलिसांची गस्त देण्यात यावी.

५) महिलांना जागृत करून या छळाविषयी माहिती देण्यास प्रवृत्त करावे.

६) मॉल बँक याभोवती असणारे टवाळखोर यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

७) या सर्व कर्मचारी-यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही मॉल व बँक यांच्यावर असून त्यांना याबाबत सक्त ताकीद देण्यात यावी.

८) निर्भया पथक दर १-३ तासाने डी मार्ट, शॉपिंग मॉल, बँकिंग क्षेत्रामध्ये पोलिसांना पाठविण्यात यावे.

९) महिलांच्या होणाऱ्या तक्रारीवर एक वेगळा विभाग नेमण्यात यावा जेणेकरून तो विभाग त्वरित कारवाई करेल.

अशा विविध मागण्या नाईक यांनी मांडल्या आहेत. तसेच यावर प्रशासन त्वरित कारवाई करेल, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.