Nigdi : भोसरी बस थांबा स्थलांतरित करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : निगडी येथील भोसरी बस स्थानक यमुनानगर कॉर्नर येथून मधुकर पवळे उड्डाण पूलाखाली स्थलांतरीत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून भोसरी बस स्टॉप निगडी (Nigdi) येथील मुंबई पुणे महामार्गावर मधुकर पवळे उड्डाण पूल बीआरटी बस स्टॉप पाठीमागे स्थलांतर करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
Chinchwad : रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या
निगडी (Nigdi) यमुनानगर कॉर्नर येथून तळवडे, थरमॅक्स चौक, दुर्गा नगर, त्रिवेणी नगर, मोरे वस्ती, चिखली के.स. बी. चौक तसेच भोसरी ह्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. भोसरी व तळवडे तसेच, चाकण एमआयडीसी भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर कामानिमित्ताने ह्या पर्यायी रस्ताचा वापर करत असतो. भोसरी बस स्थानक ह्या ठिकाणी फुटपाथ बनविण्याचे काम सुरू असून रस्ता अरुंद असून अवैध रिक्षा प्रवाशी वाहतूक रस्त्यावर सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
रोज सकाळी-संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी प्रवाशी बांधवांना बसण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिकांना रस्त्यावर उभे राहून बस येण्याची वाट पहावी लागत आहे. तर, दुसरीकडे रस्ता अरुंद असून वाहतूक कोंडी समस्या निर्माण झाली असून यमुनानगर येथील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
पीएमपीएल मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांना गेल्या आठ महिन्यांपासून भोसरी बस स्थानक स्थलांतर करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात येत असून पीएममपीएल मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.