Mahaseva Day : महासेवा दिन कार्यक्रमात नवरात्र उत्सवानिमित्त पद्मावती रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र शासनाने (Mahaseva Day) प्रत्येक कार्यालयातील प्रंलबित संदर्भ, अर्ज, तक्रारी, सेवा यांचा निपटारा करण्यासाठी 17 सप्टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्याचे निश्चित केले आहे. या अनुषंगाने दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी आळंदीमध्ये ‘महासेवा दिन’ आयोजित करण्यात आला होता. आळंदी नगरपरिषदेच्या प्रत्येक विभागाअंतर्गत प्रंलबित अथवा नवीन सेवा पुरवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यामध्ये मालमत्ता हस्तांतरण नोंदी, नव्याने नळ जोडणी, जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता उतारा, मालमत्ता कराची मागणी पत्र, मतदार यादीमधील मतदाराच्या नावाबरोबर आधार कार्ड लिंक करणे इ. सेवा पुरवण्याबाबत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आळंदी ग्रामीण रुग्णालयातर्फे रोहन लोखंडे यांस विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालय अधिक्षक शिंदे म्हणाल्या, महासेवा दिनानिमित्त आरोग्य संस्थेतर्फे आळंदी नगरपरिषदेच्या 30 ते 40 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणार आहोत.

राष्ट्रवादीचे नेते डी. डी. भोसले यावेळी म्हणाले, नवरात्र उत्सव काही दिवसांवर आला आहे. पद्मावती रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यासाठी नगरपालिका काय करणार? तेथील कामामुळे पाईपलाईन फुटल्या आहेत. त्या दुरुस्तीसाठी काही काळ जाणार आहे. ते मान्य आहे; पण काही महिला वर्ग अनवाणी पायी या रस्त्यावरून देवीच्या दर्शनाला जातात. त्यासाठी तेथील संबंधित ठेक्केदारांकडून खड्डे व्यवस्थितपणे बुजवून रस्ता दुरुस्त करणे गरजेचे आहे. नदीवरील बंधारे फुटण्याच्या मार्गावर आहेत. हे वेळोवेळी सांगितले आहे.

या कार्यक्रमादरम्यान (Mahaseva Day) काही आधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
तसेच, आळंदी रुग्णालय अडीअडचणीबाबत (13/9/2019),अंत्यविधीच्या ठिकाणी तसेच दशक्रिया विधीच्या ठिकाणी विविध कामे करण्याबाबत(10/1/2022) व इतर संदर्भातही डी डी भोसले यांनी पालिकेत अर्ज केले होते. त्या प्रलंबित अर्जाचा निपटारा अजूनही झाला नाही. संबंधित आधिकारी अनुपस्थित असल्याने ते अर्ज प्रलंबित राहणार का? असा प्रश्न उपस्थित वर्गाच्या पुढे त्यांनी मांडला.

यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी खरात,अर्जुन घोडे,अरुण घुंडरे व आरिफ शेख,सुदीप गरुड इ. स्थानिक नागरिक मान्यवर उपस्थित होते.

Today’s Horoscope 22 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.