BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : उड्डाणपूल बांधून पूर्ण, पण उदघाटनाअभावी वाहतुकीस बंद ; नागरिकांची गैरसोय

उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु करण्याची मागणी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- काळेवाडी फाट्यापासून जगताप डेअरीकडे जाणारा उड्डाणपूल राडारोडा टाकून बंद केल्यामुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याबाबतची माहिती पिंपरी चिंचवडचे रहिवासी अमित तलाठी यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. राडारोडा हटवून उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्ववत चालू करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

काळेवाडी फाट्यापासून जगताप डेअरीकडे जाताना रोज वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या सोयीसाठी या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आला. एक आठवड्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु तसे न झाल्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पूल वापरण्यास सुरवात केली. मंगळवारपर्यंत पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये जा सुरू होती. परंतु आज, बुधवारी सकाळी पुलावरून होणारी वाहतूक राडारोडा टाकून थांबविण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.

तेथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पूल नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु तसे न झाल्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पूल वापरण्यास सुरवात केली. कालपर्यंत पुलावरून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये जा सुरू होती. परंतु आज सकाळी पुलावरून होणारी वाहतूक राडारोडा टाकून थांबविण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुलाचे उदघाटन न झाल्यामुळे पूल बंद केला आहे असे स्थानिक नगरसेवकांकडून सांगण्यात आल्याचे अमित तलाठी यांचे म्हणणे आहे.

प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळाल्या नाही तरी चालतील परंतु उदघाटन करताना नेत्यांचे फोटो वर्तमानपत्रात आले पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया तलाठी यांनी दिली आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत लक्ष घालून हा उड्डाणपूल नागरिकांसाठी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.

या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने यांच्याशी संपर्क साधला असता या पुलाचे काम प्राधिकरणाकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत प्राधिकरणाचे अधिकारी अधिक माहिती देऊ शकतील असे ते म्हणाले. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

HB_POST_END_FTR-A4

.