Akurdi News : सांस्कृतिक भवनाचे काम सुरु करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – आकुर्डीमधील जुन्या कर संकलन ऑफिसच्या जागेवर होणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल दळवी यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात दळवी यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 14 आकुर्डी मधील खंडेराय भाजी मंडई जवळ असेलेल जूने कर संकलन ऑफिस च्या जागेवर महापालिकेच्या वतीने नवीन सांस्कृतिक भवन बांधण्यात येणार आहे. पण, अजून नवीन सांस्कृतिक भवन बांधण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली नाही. बरेच वर्ष झाले जुने कर संकलन ऑफिसची इमारत बंद पडून आहे. नवीन सांस्कृतिक भवनचे बांधकाम कधी सुरु होणार याची अ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता महापालिकेकडे या कामाकरिता तरतूद नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

आकुर्डी परिसरात महापालिकेचे एकही मोठे सांस्कृतिक भवन किवा मोठा हॉल छोटे मोठे कार्यक्रम करण्याकरात उपलब्ध नाही. सांस्कृतिक भवन झाले तर गोरगरीब नागरिकांना लग्न समारंभ, वाढदिवस संस्कृतिक कार्यक्रम करण्याकरिता अल्प दरात हॉल उपलब्ध होईल. सांस्कृतिक भवन बांधण्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.