Pune News : सैन्यदलात नोकरीला असल्याचे भासवून लग्नाची मागणी, बलात्कार करून भामटा पसार

एमपीसी न्यूज : भारतीय सैन्य दलात नोकरीला असल्याचे भासवून एका तरुणीसोबत मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख वाढवली. तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. आणि त्यानंतर ओळख वाढल्यावर तरुणीवर बलात्कार करून आरोपी पसार झाला. या सर्व प्रकरणाची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या. 

प्रशांत भाऊराव पाटील (वय 31) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पीडित तरुणीने फसवणूक झाल्याची तक्रार दिल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी प्रशांत याने एका प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साइटवरून पीडित तरुणीशी संपर्क साधला होता. त्याने आपण भारतीय सैनिक घरात नोकरीला असल्याचे सांगून तिच्याकडे लग्नासाठी मागणी घातली होती. त्यातूनच त्यांची ओळख वाढत गेली आहे त्याचाच फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा विविध कलमा सह प्रशांत वर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.