Mumbai : अॅड. जयदेव गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्याचे प्रमुख अॅड. जयदेव गायकवाड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आज मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी पवार यांची भेट घेण्यात आली. महाराष्ट्रात पुन्हा बळीराजाचे राज्य आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली तसेच अथक परिश्रम घेतले आणि महाविकास आघाडीचे राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्याबद्दल पवार यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

त्यावेळी मयूर गायकवाड, सामाजिक न्याय मावळ तालुका अध्यक्ष विकी लोखंडे, पुण्यातील कामगार नेते विशाल लोखंडे, संतोष बनसोडे, तुकाराम शिंदे, अक्षय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.