Vadgaon Maval : राष्ट्रीय बेरोजगार नोंदणीची तालुका काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – युवकांना रोजगार पुरविण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष हटवण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणला आहे. तर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायदा देशभरात लागू करण्याचे नियोजन असून त्याऐवजी बेरोजगारी संदर्भात काहीतरी ठोस पावले उचलावीत. 
याकरिता मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने युवकांना जाणवणारी बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय बेरोजगार नोंदणीची (एनआरयू) मागणी मावळचे तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विलास मालपोटे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, अभिषेक गोडांबे, सुधीर भोंगाडे, अमोल दाभाडे, संपत दाभाडे, संदीप मालपोटे आदी जण उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, आपल्या देशात गेल्या 45 वर्षामध्ये नव्हती एवढी बेरोजगारी सन 2014 नंतर या सरकारच्या कालखंडात वाढलेली आहे. गेल्या सहा वर्षापासून बेरोजगारी, महागाई वाढवून इतर मूलभूत समस्यांपासून सामान्य जनतेचे दुर्लक्ष करून केंद्र सरकार सुप्त राजकीय हेतू साध्य करून जाती-पातीचे राजकारण करू पाहत आहे.

सद्यस्थितीत देशाची मोडकळीस आलेली अर्थव्यवस्था व वाढती बेरोजगारी, महागाई या मुलभुत गरजांकडे सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.