Talegaon News : वर्क फॉर इक्वॅलिटी संस्थेच्या वतीने मुलांसाठी प्रात्यक्षिक आधारित उपक्रम 

एमपीसी न्यूज – वर्क फॉर इक्वॅलिटी संस्था मुलांना शालेय प्रवाहात कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि.09) तळेगाव आणि देहूफाटा येथील वंचित मुलांसाठी हाताने करावयाचा प्रात्यक्षिक आधारित उपक्रम राबविला.  

मुलांमध्ये विज्ञानाविषयी भिती कमी करुन गोडी निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमातून मुलांची निवड करून त्यांना विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्याची संधी दिली जाणार आहे. या उपक्रमासाठी शिडंलर इंडिया प्रा. लि. या कंपनीचे सहकार्य लाभले, अविष्कार इंडिया संस्थेचे संस्थापक श्रीधर यांनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन केले.

कोरोनाच्या काळात मुलांच्या शिक्षणावर आलेली बंधने, आणि कमी होत चाललेली शिक्षणातील गोडी टिकविण्यासाठी वर्क फॉर इक्वॅलिटी संस्था वाड्या वस्त्यांवरील मुलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.