Pimple Gurav : मानवी हक्क संरक्षण व जागृतीच्या वतीने डेंग्यूविषयी जनजागृती मोहीम

एमपीसी  न्यूज – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सांगवी, पिंपळे गुरव येथे डेंग्यू आजाराविषयी जनजागृती मोहीम घेण्यात आली, मंडळाच्या संध्याकाळच्या आरतीच्या वेळी व  कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे शहराध्यक्ष स्पिकरद्धारे पत्रकाद्वारे,नागरीकांना डेंग्यू होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व त्यावरील उपाययोजना  याची माहिती देतात व ही जनजागृती गणपती विर्सजणापर्यत दररोज केली जाणार आहे. 

डेंग्यू आजार होऊ नये म्हणून घरातील पाणी साठवण्यासाठी भांडी आठवड्यातून एकदा रिकामी करून कोरडी करावीत. पुन्हा पाणी भरावे. घरातील रिकाम्या करता येत नाहीत अशा मोठ्या पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील फ्लॉवरपॉट कुलर व फ्रिजच्या खालच्या ट्रेमधील पाणी दर आठवड्याला बदलावे. घरच्या अंगणात किंवा गच्चीवरील भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवती पाण्याची डबकी असल्यास ती बुजवावीत .झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात. डास प्रतिरोधक मलम लावावा. डासांना पाळविणारे साहित्य, धुप, उदबत्ती, गुड नाईट इ. वापर करावा.

_MPC_DIR_MPU_II

“डेंग्यू आजार म्हणजे डंख छोटा धोका मोठा “त्यामुळे हिवताप, डोकेदुखी, डोळ्याच्या खोबणीत दुखणे, अंगावर लालसर रंश अथवा पुरळ उठणे, तिव्र पाठदुखी इ. डेंग्यूची लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. आहारात केव्ही फळाचा वापर करावा,  भरपूर विश्रांती घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये महानगरपालिकेचे  कर्मचारी पण आरोग्याची काळजी घेण्याचे वारंवार आवाहन करीत असतात .पण प्रत्येक नागरिकांनी पालिकेकडून अपेक्षा न करता आपण स्वतःहून आपली परिसराची व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे मत शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी व्यक्त केली. यावेळी गणेशोत्सवाच्या वेळी प्लास्टिक न वापरण्याचे व गर्दीच्या ठिकाणी बेवारस वस्तू , संशयास्पद व्यक्ति आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन ही त्यांनी केले. यापुढे सोसायटीच्या आवारात पण जनजागृती करणार व ज्या सोसायटीत प्रवेश नाकारला जाईल तेथे सुरक्षा रक्षाकाडे पत्रके देउन त्यांना येणाऱ्या जाणाऱ्या  सभासदांना देण्यातचे आव्हान जोगदंड यांनी केले.  यावेळी ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यानी ही सहभाग नोंदवला.

राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, आरोग्य निरीक्षक संजय मानमोडे, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड ,विकास शहाणे,  संगीता जोगदंड,बदाम कांबळे,मुरलीधर दळवी,राहूल शेंडगे, विनायक विसपुते, गजानन धाराशिवकर, वसंत चकटे, अरविंद मांगले,जतिन जेतवण, रोहित शेळके व नूतन शेळके ,ऋतुजा जोगदंड, सूर्वणयुग मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक शहाणे,सामाजिक कार्यकर्ते. प्रदीप गायकवाड, शिवानंद तालीकोटी आरोग्य विभागाचे सुपरवायझर बामले एच एम,वरुण कांबळे आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.